घरमालकाचा भाडेकरु वर चाकूने हल्ला
भाडेकरूने देखभालीची मागणी करताच संतप्त झालेल्या घरमालकाने भाडेकरू वर चाकूने हल्ला करण्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील गाेळप येथे घडला आहे .यातील जखमी भाडेकरू युसेफ जिक्रिया पावसकर याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे घरमालक इब्राहिम पावसकर यांच्याविरुद्ध पूर्णगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गोळाप येथे राहणारे युसूफ पावसकर व घरमालक इब्राहिम पावसकर हे दोघे नातेवाईक असून इब्राहिम यांचेकडे युसूफ हा भाडेकरू म्हणून राहत होता घरात लाईट नसल्याने युसूफ याने इब्राहिम याला आम्ही भाडे देतो त्यामुळे खोलीच्या देखभाल व दुरुस्ती करणे हे तुमचे काम आहेअसे सांगितले त्यामुळे संतप्त झालेल्या
इब्राहिम यांनी युसूफच्या वर चाकूने सपासप वार केले त्यात युसूफ जखमी झाला .
www.konkantoday.com