करंजाणी प्रभागची शिक्षण परिषद संपन्न
जि. प. प्राथमिक शाळा टाळसूरे नं.१ येथे सन्मानिय शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत सन्- २०१९/२०ची करंजाणी प्रभागची शिक्षण परिषद खेळीमेळीच्या, आनंददायी वातावरणात संपन्न झाली. दि.१८/११/२०१९ वार- सोमवार वेळ – स.११.३० ते साय. ४.४० पर्यंत शिक्षण परिषदेची सुरूवात ही टाळसूरे नं.१ शाळेतील विद्यार्थांनी इतनी शक्ती हमे दे न दाता ह्या प्रार्थनेने केली.
त्यानंतर उपस्थित सर्व गुरूजनांचे स्वागत स्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा ह्या गीताने केले.
पुढे समालोचनाचे काम टाळसुरे नं.१ शाळेतील श्री. महाडिक सरांनी केले. प्रतिमा पुजन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
अध्यक्ष- श्री. संतोष भोसले साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी, बीट – करंजाणी) ह्यांना करण्यात आले. अनुमोदन टाळसुरे नं.१ शाळेचे शिक्षक श्री. सुर्वे सरांनी दिले प्रभाग करंजाणी मधील सर्व केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. कारखेले सर, श्री. मुरकर सर, श्रीम. परांजपे मँडम ( प्रतिनिधी ), श्रीम. गिम्हवणेकर मँडम तसेच टाळसुरेशाळेचे मुख्यध्यापकांचे स्वागत करण्यात आले. त्यासोबत जिल्हा आदर्श शिक्षिका श्रीम. मर्चेंडे मँडम, शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या टेटवली नं.१ शाळेतील उच्चश्रेणी मुख्यध्यापिका श्रीम. आयरे मँडम व केंद्रिय प्रमुख टेटवली श्री. मुरकर सर, वैयक्तिक क्रिडा स्पर्धेतील यशप्राप्ती बद्दल श्रीम. झगडे मँडम व केंद्रीय प्रमुख गिम्हवणेकर मँडम ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांचे लाडके विस्तार अधिकारी मा. श्री. संतोष भोसलेसाहेबांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभागात नवीन आलेल्या शिक्षकांची ओळख करुन घेण्यात आली. श्री. भोसले साहेबांनी दापोलीच्या शिक्षण अवस्था बदलण्यासाठी अथवा त्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व नामांकित शाळांचे शिक्षक तसेच तज्ञ व्यक्तींना घेऊन तयार केलेले उपक्रम, व दापोली तालुका आपापल्या स्तरावर काय प्रयत्न करत आहेत? त्यांनी कोणते आधुनिक आणि प्रायोगिक उपक्रम राबवले आहेत? तसेच त्यांच्या या प्रयोगांची, पुढारलेल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, दखल घेतली जावी, त्या प्रयोगांचा प्रसार व्हावा आणि एकुणच शिक्षण जागृती व्हावी या दृष्टीने जे उपक्रम जन्माला आले ते म्हणजे *व्हिजन दापोली* शैक्षणिक उपक्रम तयार केला त्याच उपक्रमाचे शिक्षण परिषदेत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपक्रमातील खालील घटकांवर १) वाचु आनंदे २) ज्ञानकुंभ ३) मुलाखत ४) अल्फाबेटिकल हजेरी ५) इन्स्ट्रक्शन स्किल ६) रांगोळी पाटी ७) प्रश्न मंजुषा व इतर शिष्यवृत्ती इ. ५ वी व ८ वी साठीचे ओनलाईन फाँर्म भरणे.
तसेच आपल्या तालुक्याचा आदर्श इतर तालुक्यात घेण्यात आला. असाच आदर्श आपण सर्वांसमोर ठेऊया.दुपारी शिष्यवृत्ती तासिकाच घेणे व शिष्यवृत्ती सराव परिक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली.
केंद्रीय प्रमुख टाळसुरे श्री. कारकिले सर ह्यांनी तंबाखू मुक्तता संबंधित महत्त्वाचे ११ निकषांवर सविस्तर मार्गदर्शन व चर्चा केली.
प्रशस्तीपत्र मिळवण्यासाठी tobacco free app द्वारे शाळेची माहिती online भरणे, त्यासाठी शाळेत ठेवावयाची पुरावे ह्यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले.श्री. भोसलेसाहेबांनी प्रशासकीय सुचना व मार्गदर्शन केले. गणवेश रक्कम जमा झालेल्या शाळांचे आढावा घेण्यात आला.आदर्श शाळा प्रस्ताव करण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले.मंजुरी मिळालेल्या दुरुस्ती, नवीन दुरुस्ती ह्यांचा आढावा सन – २०१७/१८ व २०१८/१९ सन – २०१९/२० साठी नवीन दुरूस्ती प्रस्ताव सादर करणे सुचना व मार्गदर्शन करण्यात आले.क्रिडास्पर्धा –
डिसेंबर – पहिला आठवडा केंद्र
दुसरा आठवडा बीट – बोंडवली येथे होइल.
तिसरा आठवडा तालुका
चौथा आठवडा जिल्हा अविष्कार कार्यक्रम बीटस्तरीय जालगावकर केंद्रात घेण्यात येईल. तारखा नंतर सांगण्यात येतील.विज्ञान प्रदर्शन
डिसेंबर महिण्यात घेण्यात येणार आहे तयारीत राहावे. तारखा लवकरच कळवण्यात येतील. सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्विता श्री. कासारे सर श्री. सुर्वे सर श्री. महाडिक सर श्री. खोत सर जि.प.प्राथमिक शाळा टाळसुरे नं.१ शिक्षक टीम व केंद्रीय प्रमुख आभार
श्री. कासारे सरांनी मानले.