स्पेअर पार्टचा पुरवठा नाही एसटीच्या अनेक गाड्या बंदअवस्थेत,वाहतुकीवर परिणाम
विविध कारणांमुळे तोट्यात असलेल्या एसटी मंडळाचा कारभार दिवसेन दिवस खालावत आहे एसटीच्या नादुरुस्त गाड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत .एसटी गाड्यांना दुरुस्तीसाठी राज्यस्तरावरून स्पेअरपार्ट येत असतात परंतु गेल्या दीड महिन्या स्पेअरपार्टचा खडखडाट झाला आहे त्यामुळे अनेक गाड्या दुरुस्त होऊ न शकल्याने बंद आहेत रत्नागिरी शहर वाहतुकीसाठीअडतीस गाड्या चारशे पन्नास फेऱ्या मारतात परंतु त्यातील काही गाड्या बंद असल्याने १५०अधिक फेऱया बंद कराव्या लागल्या आहेत तर ग्रामीण वाहतुकीसाठी देखील अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे यातच बऱयाचवेळेला डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक वेळा ऐनवेळी बसच्या फेऱ्या रद्द केल्या जातात स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत नुसती आश्वासने न देता यात ठोस पावले उचलावीत अशी जनतेची माफक अपेक्षा आहे .
www.konkantoday.com