राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या रत्नागिरी विभाग फेरीत मंजिरी काणे प्रथम
रत्नागिरी – स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ-पावस आणि सप्तसूर म्युझिकल्स-रत्नागिरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय “श्रीमत् संजीवनी गाथा” अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी विभागाची स्पर्धा आज रत्नागिरीत ल.वि. केळकर वसतिगृहाच्या सभागृहात पार पडली. रत्नागिरी विभागात आज मंजिरी काणे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रत्नागिरीत एकूण 20 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ-पावस आणि सप्तसूर म्युझिकल्स-रत्नागिरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय “श्रीमत् संजीवनी गाथा” अभंग गायन स्पर्धेच्या रत्नागिरी विभागात आज मंजिरी काणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय- करुणा पटवर्धन, तृतीय- कश्मिरा सावंत (सर्व रत्नागिरी), चतुर्थ- विपूल निमकर-गुहागर, पाचवा-आत्माराम गोसावी-वेंगुर्ले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय रानडे, विलास हर्षे, नीलकंठ गोखले यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे संयोजन सप्तसूर म्युझिकल्स या रत्नागिरीतील संस्थेने केले त्यात कार्यवाह निखिल रानडे, अध्यक्ष संतोष आठवले आणि संस्थापक निरंजन गोडबोले तसेच संस्थेच्या सेक्रेटरी सौ. प्राची निमकर- रानडे यांनी मोलाची कामगिरी करत ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. या स्पर्धेसाठी जयंतराव देसाई, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश जोशी सर, हेमंत गोडबोले आणि खल्वायन संस्थेचे संस्थापक प्रदीप तेंडुलकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वामी स्वरूपानंद यांच्या अभंगांची संकल्पनाकार हेमंत गोडबोले यांची होती. रत्नागिरीतील श्रीनिवास जोशी, विजय रानडे तसेच विलास हर्षे यांचे स्पर्धेसाठी बहुमोल मार्गदर्शन झाले. अखिल चित्पावन ब्राह्मण संघ-रत्नागिरी यांचेही सहकार्य लाभले. ही स्पर्धा घेण्यासाठी परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस विश्वस्त आणि संस्थापक जयंतराव देसाई यांनी बहुमोल सहकार्य केले आणि विश्वास दाखवला हा विश्वास संयोजकांनी सार्थ ठरवला.