
शिकाऊ अथवा पक्का परवाना मिळविण्यासाठी वाहनधारकांना घ्यावी लागणार आरटीओची शपथ
शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठी आता यापुढे प्रत्येकाला वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. ही शपथ चाचणीपूर्वी दिली जाणार आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना याबाबत परिवहन विभागाने सूचित केले आहे. त्याची अंमलबजावणी कधीही होणार आहे.
सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी परिवहन विभाग विविध उपाययोजना करीत आहे. मात्र वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. नियमांचे उल्लंघन करणे किंवा वाहनधारकांजवळ आततायीपणामुळे जास्तीत जास्त अपघात घडत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे वाहनधारकाला जबाबदारीने बांधून ठेवण्यासाठी शिकाऊ किंवा पक्क्या परवान्यासाठी प्रत्येकाला वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com