अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱयांच्या भातशेतीचे व भात पेंढीचे नुकसान

0
81

जिल्हयात सर्वत्र भापकापणीला वेग आला असतानाच वादळी वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे भातशेतीसोबत आता भाताच्या पेंढ्यांचेही नुकसान होत असल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या काही भागात गेल्यादिवसांपासून पाऊस पडत आहे.याच काळात हळवी शेती तयार होवून कापणीला आली आहे. शेतकरी कापलेले भात ओले होवून कुजत आहे. काही ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने भाताचा पेंढा कुजला आहे. तसेच मळणीसाठी तयार केलेल्या उडव्यांमध्ये पाणी शिरल्याने पेंढा कुजत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here