प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी हातखंबा येथील कामकाज प्रत्येक दिवशी सुरू राहणार
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी हातखंबा येथिल कामकाज आठवड्यातील प्रत्येक दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे.
२२ ऑगस्ट २०१९ च्या आदेशान्वये त्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले होते. वाहनधारकांना योग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी इतर कामकाजाप्रमाणे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पूर्वनियोजित वेळ घेणे आवश्यक आहे. २६ ऑगस्टपासून प्रत्येक आठवड्यातील साोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी मौजे हातखंबा येथे व उर्वरित दिवशी गुरूवार, शुक्रवार व शनिवार चिपळूण ट्रॅकसाठी आठवड्यातील तीन दिवस घेण्यात येत होते आता मात्र प्रत्येक आठवड्यातील सर्व दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज करण्यात येईल व चिपळूण येथे प्रत्येक आठवड्यातील गुरूवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी कामकाज करण्यात येईल. तरी वाहनधारकांनी उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com