मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा विषय झालेलाच नाही,भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार -मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

0
63

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा कालावधीची कधीही माझ्यासमोर चर्चा झालेली नाही असे परत एकदा स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले.अशा प्रकारचे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व नितीनजी गडकरी यांच्या समोरही झाले नसल्याचे त्यानी सांगितले.जनतेने महायुतीला कौल दिला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत आम्हाला आणखी पर्याय खुले असल्याचे सांगितले होते.त्यांच्या या भूमिकेने आम्हाला धक्का बसला होता. शिवसेनेशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आपणही तीन वेळा उद्धव ठाकरेंना फोन केला परंतु तो त्यांनी घेतला नाही.शिवसेनेला भाजपशी चर्चा करण्यात वेळ नाही मात्र काँग्रेस राष्ट्रवादीशी ते दिवसातून तीन वेळा चर्चा करीत होती. शिवसेनेने भाजपच्या प्रमुख नेत्यांवर टीका करण्यावर भर दिला.केंद्रात व राज्यात सरकारमध्ये रहायचे व सरकारवरच टीका करायची ही शिवसेनेच्या भूमिकेत सांगूनही बदल झाला नाही या बद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे .शिवसेनेचे संबंधित लोक कोणत्याही थराला जाऊन टीका करीत आहेत त्यामुळे संबंध बिघडले.सध्या मला काळजीवाहु मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे.महाराष्ट्रात जनतेने महायुतीला कौल दिला आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊ नये अशी आपली इच्छा आहे.या पुढील काळात सरकार हे भाजपच्याच नेतृत्वाखाली येईल असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.भाजप आमदार फोडत असल्याचा आरोप होत आहे.या आरोपात कोणतेही तथ्य नाही यांनी पुरावा समोर आणावा सरकार स्थापन करताना कोणताही घोडेबाजार केला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.पुढील सरकार हे भाजपच्या नेतृत्वाखाली येईल असे सांगितल्याने भाजप शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here