मिरकरवाडा येथे खलाशांच्या टोळक्याकडून तरुणावर धारदार शस्त्राने वार

0
52

मिरकरवाडा येथे रस्त्याने मोबाईलवर बोलत जात असणाऱ्या महम्मद तारीक कोतवडेकर यांच्यावर पाठीमागून येऊन धारधार हत्याराने वार करून मोबाईल हिसकावून पलायन गंगाराम रामजीवन थारू (वय २४ रा. टिकापूर-नेपाळ), विष्णू गणतीराम डंगोरा थारू (वय २३,रा. टिकापूर जि. कैलेली-नेपाळ), सुरेश सुंदरलाल चौधरी (वय २२, रा. लिकपूर-नेपाळ), सुरेश पशुराम चौधरी (वय २४, रा. टिकापूर-नेपाळ सर्व सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथे घडली. महम्मद तारीक अहमद कोतवडेकर (वय २९ रा. ८० फुटी हायवे, मांडवी-रत्नागिरी) हे मोबाईलवर बोलत चालत जात असताना संशयितांनी त्यांच्या पाठीमागून टी-शर्ट ओढून कोणत्यातरी धार-धार हत्याराने डाव्या हातावर गंभीर दुखापत करून मोबाईल चोरून नेला या प्रकरणी पावसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चार खलाशांना पोलिसांनी अटक केली आहे .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here