रत्नागिरी शहर पाणी योजनेवरील जादा खर्च, मुदतवाढीला राष्ट्रवादीसह भाजपाचा विरोध
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्याच झालेल्या रत्नागिरी पालिकेच्या सभेत सुधारित नळपाणी योजनेच्या कामावरून पुन्हा जोरदार गदारोळ झाला. पाणी योजनेच्या निविदेतील कामा व्यतिरिक्त इतर कामांना स्वतंत्र निधीची तरतूत करण्याला राष्ट्रवादीसह भाजपा नगरसेवकांनी विरोध केला. अखेर याबाबतचा निर्णय एमपीजीने घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय योजनेसाठी मुदतवाढ देण्याला नगरसेवकांनी विरोध केला. चार महिन्यांच्या स्थगितीमुळे वाया गेलेले १४० दिवस मुदतवाढ द्या यापेक्षा जादा मुदतवाढ देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी केली.
यावेळी निविदाबाह्य कामांचे पैसे देण्याचा निर्णय एमपीजीने घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे नगरसेवक मुन्ना चवंडे यांनी एमपीजीने जरी निर्णय घेतला तरी ठेकेदाराला पैसे देणार कोण? निविदाबाह्य कामांची पत्रे ठेकेदार कंपनीने एमपीजीलाही दिली आहे. या पाच महिन्यात एमपीजीने कोणताच निर्णय घेतला नाही. उद्या एमपीजीने ठरवलं तर निधी आणणार कुठून असा सवाल मुन्ना चवंडे यांनी उपस्थित केला
www.konkantoday.com