वादळी वातावरणामुळे मच्छिचे दर गगनाला भिडले, खवय्ये नाराज
क्यार वादळाच्या तडाख्यामुळे व त्यानंतर सततच्या वादळी वातावरणामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला. त्याचा परिणाम मच्छिच्या दरावर झाला आहे. सुरमई, पापलेटचे दर गगनाला भिडले आहेत. तब्बल एक हजार रुपये किलो विक्रीचा दर असून कोळंबी, शितक, हलवा या नेहमीच्या माशांचेही दर पाचशेच्या पुढे गेले आहेत.
अनेक मासे बाजारातून गायब झाल्याचे चित्र आहे. सुरमई आणि पापलेट या दोन प्रमुख माशांचे दर एक हजाराच्या घरात आहेत. कोळंबीचा दर सहाशे पासून पुढे आहे. हलवा सातशे ते आठशेच्या घरात आहे. बांगडा आणि गेजर तर बाजारातून गायब झाले आहेत. यामुळे महागड्या दरामुळे खवय्ये नाराज झाले आहेत.
www.konkantoday.com