भाजपाच्या शपथविधीची तयारी सुरू
मुख्यमंत्री म्हणून २०१४ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा याच ठिकाणी दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा शपथविधी समारंभ होणार असून या समारंभाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्याच्या या शपथविधीची संपूर्ण जबाबदारी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी चित्रपटाचे भव्य सेट उभारणाऱ्या कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर या सोहळ्याचे नियोजनचे कंत्राट दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
www.konkantoday.com