
आंबेनळी घाटात एस.टी. अपघातात मागील अपघाताची पुनरावृत्ती?
तालुक्यातील आंबेनळी घाटात गेल्या वर्षी दापोली कृषि विद्यापीठाची बस कोसळून झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती अक्कलकोट-महाड एस.टी. बस दरीत कोसळून घडली. मात्र यावेळी सुदैवाने एका आंब्याच्या झाडाला ही बस आदळल्याने मोठ्या प्रमाणावरील मनुष्यहानी टळली आहे. मात्र या घटनेत देखील नेहमीच्या चालकाऐवजी अन्य चालक ही बस चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातास कारणीभूत असलेला चालक व या बसवरील अधिकृत असलेला नियुक्त केलेला चालक या दोघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com