पांढर्या समुद्रावर टेट्रापॉडचा बंधार्याला प्रशासकीय मान्यता
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील मत्स्य बंदर विकास प्रकल्पात टेट्रापॉड कामासाठी निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामासाठी १८९ कोटी ६७ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मुरूगवाडा, झाडगांव, १५ माड, कोंड, भाटिमिर्या, जाकिमिर्या, पांढरा समुद्र, मोर टेम्बपर्यंत टेट्रापॉड व ग्रोयनचा बंधारा उभारण्यात येणार आहे
त्यामुळे या बंधार्याचे ४० वर्षापासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकणार आहे .
www.konkantoday.com