पोलीस अधीक्षकांच्या आपुलकीने कर्मचारी भारावले
अधिकारी व कर्मचाऱयांत यांच्यात आपुलकीचे नाते कसे असावे याचे उदाहरण जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी घालून दिले आहे .
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी यंदा रत्नागिरी पोलिसांची दिवाळी अविस्मरणीय केली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचार्यांसोबत फराळाचा आस्वाद घेत पोलीस कर्मचार्यांना दिवाळी भेटवस्तूही दिल्या. आपल्या वरिष्ठांनी कर्मचार्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ असून सर्व कर्मचार्यांना भेटवस्तू देणारेही हे पोलीस अधीक्षक पहिले ठरले आहेत. डॉ. प्रविण मुंढे यांनी आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी सर्व कर्मचार्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. प्रविण मुंढे यांची पत्नी अमृता मुंढे, मुलगी देवयानी यांच्यासमवेत कर्मचार्यांसोबत दिवाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी केली. यावेळी कर्मचार्यांसोबत फराळाचाही आस्वाद डॉ. मुंढे यांनी घेतला. पुण्यात असतानाही डॉ. प्रविण मुंढे यांनी तेथील कर्मचार्यांना फराळ वाटप केले होते.
www.konkantoday.com