
प्रवासी भाड्यावरून वाहतूकदारांमध्ये हाणामारी
चिपळूण येथे पुणे मार्गावर प्रवासी भरण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात दोन सख्ख्या भावानी एका खासगी वाहतूक करणार्यास बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील विरेश्वर तलाव परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन चंद्रकांत शिंदे (२९), समीर चंद्रकांत शिंदे (३२, दोघेही कळकवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रशांत शंकर मांजलेकर (२८, अलोरे) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
www.konkantoday.com