पाच वर्षात १ कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २०२५ पर्यंत १ कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी केमिकल उद्योगाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधकारी डॉ. पी. अनबलगन यांनी लोटे येथे केले.
लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने लोटेतील रासायनिक औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेवून वसाहतीमध्ये येणारे रासायनिक द्रव्यांचे टँकर, कंटेनर व ट्रक सुरक्षित ठिकाणी पार्किंग हाेण्यासाठी ट्रक टर्मिनल प्रकल्पाचा संकल्प सोडण्यात आला होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने यासाठी २० हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली असून या जागेवर उभारण्यात येणार्या टर्मिनलचे भूमिपूजन करण्यात आले.
www.konkantoday.com