आचारसंहिता चालू असताना रॅली काढली,आमदार संजय कदम,वैभव खेडेकर यांच्यासह दोनशे पन्ना जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
322

निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना व जमाव बंदी असताना देखील देखील विना परवाना रॅली कडून आचारसंहितेचा भंग केला या आरोपावरून आमदार संजय कदम ,साै.सायली कदम,वैभव खेडेकर यांच्यासह दोनशे पन्नास जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आचारसंहिता असतांना व मनाई आदेश असताना देखील आमदार संजय कदम व वैभव खेडेकर यांनी गाडीमधून व माेटार सायकल यांचेसह जमाव करून रात्री रॅली काढली.हा प्रकार खेड काळकाई मंदिर येथे घडला होता या मध्ये दोनशे पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोठमोठ्या घोषणा देत ही रॅली चालली होती. पोलिसांनी मनाई करूनही ही रॅली काढण्यात आली. पोलिसांनी ही रॅली रोखली व थांबवली. मनाई आदेश असताना देखील रॅली काढल्या बद्दल या सर्वांविरूद्ध आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here