शेंबवणी, ससाळे येथे बिबट्याचा संचार
राजापूर तालुक्यातील शेंबवणे, रसाळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. बिबट्या ही मादी असून पिल्लांसहीत परिसरात फिरत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. रसाळे, पांगरे, शेंबवणे गावाचा भौगोलिकदृष्टीने विचार करता डोंगराळ भाग आहे. हाभाग जंगली आहे आणि गावांमधील वाड्या विखुरलेल्या अशा वसलेल्या आहेत. या गावांमधून रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता असून या ठिकाणी बिबट्या दिवसाही दिसत आहे.
www.konkantoday.com