जनशताब्दी एक्स्प्रेस अत्याधुनिक करण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावर सुरू केलेल्या मुंबई ते मडगांव या जनशताब्दी एक्स्प्रेसला त्यावेळी अत्याधुनिक बोगीची गाडी म्हणून प्रवाशांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले होते. ही गाडी बाराही महिने हाऊसफुल्ल असते,
सध्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्यांची अवस्था जुनी झाली आहे तसेच सीट कव्हर्स, खिडक्यांचे पडदे, सीटसमोरील टी पॉयअशा सुविधा मोडकळीला आल्या आहेत. जनशताब्दी एक्स्प्रेसला मांडवी कोकणकन्या एक्स्प्रेसप्रमाणे डब्यांना तसेच आतील सजावटीला अत्याधुनिक रुप द्यावे अशी प्रवाशांची मागणी आहे
www.konkantoday.com