रत्नदुर्ग पिस्तूल व रायफल क्लब येथून उभरतायत नवीन नेमबाज

(भोपाळ,मध्यप्रदेश): ७ डिसेंम्बर २०१९ ते ४ जानेवारी २०२० दरम्यान MP शूटिंग रेंज वर ६३वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. ह्या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ नवीन नेमबाजानी अहेमदाबाद गुजरात येथे पार पडलेल्या पात्रता फेरीत उज्वल यश संपादित केले आहे.

१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात *स्वयंम विक्रांत देसाई*,

२५ मीटर सेंटर फायर प्रकारात *श्री.विशालजी रमाकांत देसाई*,

५० मीटर स्मॉल बोर प्रकारात १.पाग,चिपळूण येथील *कौस्तुभ विलास सुर्वे*,
२.लांजा येथील *मोहनिश नंदकुमार हिरवे* आणि ३.शिवाजीनगर,रत्नागिरी येथील *अथर्व निलेश काळे* ह्यांचा समावेश आहे

ह्या वर्षी इंदोर व अहेमदाबाद येथे पार पडलेल्या पात्रता स्पर्धे साठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण चौदा नेमबाजानी आपला सहभाग नोंदवला होता.

निवड झालेल्या सर्व नेमबाजानी राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज श्री.विनय देसाई (पिस्तुल प्रशिक्षक) व श्री.पुष्कराज इंगवले(रायफल प्रशिक्षक) यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button