सिंधुदुर्ग शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्याकडे आढळली अडीच लाखांची बेहिशोबी रक्कम ,भरारी पथकाची कारवाई
शिवसेनेचे कणकवली विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्याकडुन २ लाख २९ हजार ५०० रुपयाची बेहिशोबी रोख रक्कम पोलीस व निवडणूक भरारी पथकाने छापा टाकून जप्त केली. कणकवली येथील हॉटेल त्रिफळा येथे हा छापा टाकण्यात आला. ३९ हजार रुपयाची रोख रक्कम बोरकर यांच्या बॅगेत सापडली तर दोन लाख रुपयाची रक्कम त्यांच्या गाडीमध्ये सापडून आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री करण्यात आली. हे हॉटेल नाईक याच्या मालकीचे आहे.
www.konkantoday.com