रत्नागिरी जिल्हय़ात कोणत्याच पक्षाचे बडे नेते प्रचारासाठी आले नाहीत
राज्यात विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक व महत्त्वाचे नेते सभा घेत आहेत. रत्नागिरी जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. निवडणुकीला अवघे ३ दिवस शिल्लक असताना एकाही मोठ्या नेत्याच्या सभेचे नियोजन कोणत्याच पक्षाने केलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची सभादेखील रद्द झाली आहे. शिवसेनेची जिल्ह्यात मोठी ताकद असल्याने युतीचे नेते याठिकाणी येण्यापेक्षा आवश्यक असलेल्या ठिकाणी सभा घेत आहेत गुहागर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बेटकर हे शिवसेनेचे बलाढ्य नेते भास्कर जाधव यांना लढत देत आहेत बेटकर यांच्या प्रचारासाठी खासदार सुनील तटकरे येतील अशी अपेक्षा होती परंतु ते आले नाही त्यामुळे नेते स्थानिक पातळीवरच प्रचार करत आहेत .
www.konkantoday.com