बीएसएनएलचे २८ टॉवरना निवडणुकीपुरते जीवदान
चिपळूण भागातील बीएसएनएलचे २८ मोबाईल टॉवरचे वीज बिल थकल्याने महावितरणने टॉवर वीजपुरवठा खंडीत केला होता. दरम्यान सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने जिल्हाधिकार्यांच्या सुचनेनुसार महावितरणने २८ टॉवरचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. त्यामुळे बंद पडलेले टॉवर्स पुन्हा सुरू झाले. आचारसंहिता संपण्यापूर्वी बीएसएनएलने थकित वीज बिलाची रक्कम महावितरणकडे जमा न केल्यास टॉवर्सचा वीजपुरवठा पुन्हा खंडीत केला जाणार आहे.
www.konkantoday.com