
दापोली शहरात सापडला गांजा
सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दापोलीमध्ये गांजा सापडल्याचा प्रकार घडला आहे.दापोली शहरातील कोकंबा आळी मध्ये असलेल्या एका कार मधून पोलिसांना गांजाचा साठा सापडला आहे.
भर शहरात चक्क एका गाडीमध्येच असा अमली पदार्थांचा साठा सापडल्याने दापोली सारख्या शांत शहरात खळबळ उडाली आहे.खेड डीवायएसपी प्रविण पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पक्ती यांनी संयुक्तपणे ही करवाई केेली आहे.
www.konkantoday.com