कोकणात पुन्हा बरसणार पाउस
महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमधून मान्सूनने एक्झिट घेतला असला तरी.मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी शुक्रवारपासून पुन्हा दमदार पाऊस बरसण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा जोर शुक्रवारपासून पुढील तीन-चार दिवस कायम राहील, असेही यात नमूद करण्यात आले आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान चक्राकार वारे सक्रिय झाले आहे. उत्तर श्रीलंका ते मध्य अरबी समुद्रादरम्यान द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्हींचा प्रभाव येत्या दोन दिवसांत वाढणार असून, त्यामुळे काही ठिकाणी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान खात्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारपासून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला.
www.konkantoday.com