रत्नागिरीत पोलीस दलातर्फ कोस्टल मॅरेथॉन
युनायटेड रत्नागिरी ऑफ युनायटेड इंडिया असा संदेश घेऊन ९ नोव्हेंबरला पोलीस दल तसेच स्थानिक संस्थांच्या मदतीने कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन केले असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. या मॅरेथॉनमध्ये पोलीस दलासह जे. एस. डब्ल्यू., आंग्रे पोर्ट, लायन्स क्लब, रोटरी क्लब, पत्रकार तसेच स्थानिक संस्था सहभागी होणार आहे. ९ ला सकाळी सहा वाजता पावस ते भाट्ये अशी मॅरेथॉन करण्याचे दृष्टीने विचार सुरू आहे.
www.konkantoday.com