कस्टम विभागाला बंदराच्या निर्यातीमधून मोठा महसूल

0
60

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कस्टमला यंदा ११४७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील फिनोलेक्स, जिंदाल, आंग्रे पोर्ट आणि सिंधुुदुर्गातील रेवस रेड्डी या चार बंदरातून सर्वाधिक महसूल मिळाला. यात सर्वाधिक महसूल जिंदालमधून प्राप्त होता. जिंद‍ालच्या बंदरातून ५३६ कोटी, तर फिनोलेक्समधून २३७ कोटींचा महसूल मिळाला. कस्टम विभागांतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फिनोलेक्स, जिंदाल, आंग्रे पोर्ट आणि रेड्डी या चार मोठ्या बंदरांचा समावेश आहे. या बंदरामधून होणार्‍या निर्यातीतून कस्टम विभागाला महसूल प्राप्त होत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here