वादळी वारे व पावसामुळे अडचणीत आलेल्या मच्छीमारांना आता ट्रिगर माशाच्या आक्रमणाने धास्ती भरली आहे.पावसाची बंदी उठल्यानंतरही खराब हवामानामुळे मच्छीमारांना व्यवसाय करणे कठीण झाले होते.आता मच्छीमार आपल्या नौका घेऊन मासेमारीसाठी जात आहेत परंतु किनार्‍यालगत असणाऱ्या ट्रिगर मासळीच्या आक्रमणामुळे सुरमई पापलेट सारखे मासे खोल समुद्रामध्ये गेले आहे.ट्रिगर मासा हा मांसाहारी असल्यामुळे तो सुरमई पापलेट सारख्या माशांवर हल्ला करत आहे.यामुळे या माशांची टंचाई निर्माण झाली आहे.सध्या मच्छीमारांच्या हाती महाकुळ व कोकेरी सारखेच मासे लागत आहे.याचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here