राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा तालुक्यात जोरदार प्रचार
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस आघाडीतर्फे सुदेश मयेकर हे रिंगणात उतरले आहेत.त्यांची लढत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे उदय सामंत यांच्याशी होत आहे.सध्या सुदेश मयेकर व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मार्फत रत्नागिरी तालुक्यामध्ये जोरदार प्रचार करण्यात येत आहे.पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत आहेत.सुदेश मयेकर यांना रत्नागिरीतील विविध स्तरावर लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.मोठ्या संख्येने तरुण त्यांच्याबरोबर जोडले गेल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com