पोलिस आरटीओ विभागातील महिला कर्मचारी व कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर
रत्नागिरी येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने पोलीस व आरटीओ विभागातील महिला कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांसाठी ९ते२३ऑक्टोबर या कालावधीत चिपळूण येथील वालावलकर हॉस्पिटल येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहितीजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली .
या कॅम्पमध्ये महिलांसाठी सोनाे- मॅमोग्राफी ,सोनोग्राफी स्तन तपासणी ,या तपासण्याबरोबरच महिलांच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या सुविधेचा महिलांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड फिनोलेक्स एचआरडी विभागाचेकाकडे, अभिषेक साळवी आदी जण उपस्थित होते .
www.konkantoday.com