
रेल्वे स्टेशनवर महागडा मोबाइल चोरला दोन आरोपींना अटक
रत्नागिरी येथील शांतीनगर रसाळवाडी येथे राहणारे कुलदीप फटकरे हे त्यांचा मित्र मुंबईहून येणार असल्याने त्याला आणण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाकड्यावर बसले होते. तेथे त्यांना झोप लागली झोपेतून जागे झाल्यावर खिशात ठेवलेला मोबाइल आढळून आला नाही.हा विवाे कंपनीच्या बावीस हजार रुपये किमतीचा मोबाइल होता.त्यांनी तेथे असलेल्या रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी सीसी फुटेज पाहून तेथे जवळवफिरणारे आरोपी प्रकाश सुगवेकर राहणार पनवेल तसेच दुसरा आरोपी कमला राज पती राहणार मध्यप्रदेश यांना अटक करून त्यांच्याकडून मोबाइल हस्तगत केला .
www.konkantoday.com




