चिपळुणातील बहादूरशेख नाका येथील जुगार अड्ड्यावर धाड ,११जणांना अटक
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे घराच्या दुसर्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड घातली .यावेळी जुगार करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून २लाख १९हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही धाड घातली.
www.konkantoday.com