अखेर आज होणार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण

0
248

बरेच दिवस रेंगाळलेल्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अखेर ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आज दिनांक २ ऑक्टोबर नारायण राणे त्यांचे सुपुत्र तसेच स्वाभिमानचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.नारायण राणे हे स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीनीकरण करणार आहेत.कालच कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.आता नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.राणेंच्या भाजप प्रवेशाला विरोध करणारी शिवसेना आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here