महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे.शिवसेनेने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली.अश्यातच काँग्रेसनेपण आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 20 विद्यमान आमदारांना संधी दिली गेली आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेसने आघाडीची एकत्रित घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here