मेर्वी ,कुर्धे भागात बिबट्या काही ग्रामस्थांची पाठ सोडेना,परत एकदा शेतकऱ्यांवर हल्ला
गणेशगुळे, मेर्वी , कुर्धे भागात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे वनखात्याने कॅमेरे,पिंजरे लावून देखील बिबट्या त्यामध्ये कैद होत नाही मेर्वी परिसरातील शेतकरी प्रेमानंद आंब्रे हे आपल्या शेतात पंप चालू करण्यासाठी गेले असता बांदा पलीकडून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*
_________________________
त्यांच्या डोक्याला व पायाला पंजा मारून इजा केली आंब्रे यांनी प्रतिकार केल्यावर बिबट्या पळून गेला. जखमी झालेल्या आंब्रे यांना यांना रुग्णालयात दाखल करण्यात झाले आहे . बेसावध क्षणी बिबटे ग्रामस्थांवर हल्ले करीत आहेत रात्री व अंधाराचा फायदा घेऊन बिबटे मोटारसायकलवरून जाणार्या ग्रामस्थांवर हल्ला करीत आहेत दोन दिवसांत तीन जणांवर हल्ल्याचा बिबट्याने प्रयत्न केला आहे
www.konkantoday.com