मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने महिलेच्या हातातील पर्स चोरून नेली
आपल्या कुटुंबासोबत रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील पर्स मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने खेचून चोरून नेली या पर्समध्ये वीस हजार रुपयांचा ऐवज होता.ही घटना चिपळूण येथे घडली.
खेंड येथील राहणाऱ्या सौ मिनल पांचाळ या आपल्या पती व मुलीसह जात असताना खेंड लवेकर गोडावून येथे पाठीमागून मोटारसायकल वरुन दोन चोरटे आले. मोटरसायकलवर पाठी बसलेल्याने इसमाने महिलेच्या हातातील पर्स खेचून घेतली व ते फरारी झाले .या पर्समध्ये दागिने व रोख रक्कम मिळून वीस हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
www.konkantoday.com