कोकण रेल्वेची स्थानके चकाचक !
कोकण रेल्वेचे स्थानके आता चकाचक दिसू लागली आहेत. कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयामार्फत स्वच्छता पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, कार्यशाळेच्या आयोजन, प्लास्टिक मुक्तीची गरज, प्लास्टिकचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जात आहे. चित्रकला स्वच्छता स्पर्धा विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कोकण रेल्वेचे कर्मचारी यांच्या मार्फत खेड, रत्नागिरी स्थानकांवर पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जनतेने प्लॅस्टिकचा वापर करू नये यासाठी प्लॅस्टिकला उपलब्ध असलेले पर्याय व त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन वेगवेगळ्या स्थानकांवर भरवण्यात येत आहेत.हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून त्यानंतर एकदा वापरल्या जाणाऱ्या व पुनर्प्रक्रिया न करता येणाऱ्या प्लास्टिकच्या उत्पादनांवर कोकण रेल्वेच्या वतीने बंदी घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत .
www.konkantoday.com