दापोली कृषी विद्यापीठात ‘फिश ऍक्वेरियम उभे राहणार-पालकमंत्री वायकर
निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विविध उपक्रम तसेच योजना राबवून पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्ह्यातील सौंदर्यात तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कृषी विद्यापीठामध्ये ‘फिश ऍक्वेरियम’ स्थापण्यासाठी नाविन्य पूर्ण योजनेतून तब्बल १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या ठिकाणी ऍक्वेरियम उभे राहिल्यास त्याचा फायदा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बरोबर मोठय़ा प्रमाणात येणार्या पर्यटकांना होणार आहे व हे एक्वेरियम पर्यटकांच्या दृष्टीने मोठे आकर्षण बनू शकणार आहे.
www.konkantoday.com