
पर्ससिन मासेमारी वरील बंदी उठवावी ,शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
विविध कारणांमुळे मत्स्य उत्पादनात सातत्याने घट होत असून त्यावर अवलंबून असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. पर्ससीन मच्छीमारांचे शिष्टमंडळ रत्नागिरी जिल्हय़ाच्या दौर्यावर येणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.पर्ससीन मासेमारीवरील बंधने उठवावी डॉक्टर सोमवंशी समितीने लागू केलेल्या काही जाचक अटी रद्द कराव्यात.पर्ससीन मासेमारीचा पूर्ण हंगामासाठी मासेमारीसाठी मुदत द्यावी मिनी पर्ससीन आणि रिंग सीन परवाने पुन्हा चालू करावेत अशा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. शासन एकीकडे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.मात्र मासेमारी क्षेत्रात पारंपरिक पद्धतीचाच अवलंब करण्याचा निर्णय घेत आहे.या सर्वांचा विचार करून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com