जिल्ह्यात इको टुरिझम सारखे प्रकल्प राबविणार -राजश्री विश्वासराव
रत्नागिरी जिल्ह्यात इको टुरिझम सारखे प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपच्या नेत्या राजश्री विश्वासराव यांनी दिली.राजश्री विश्वासराव यांची नुकतीच महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकणात वनसंपदा मोठी आहे या वनसंपत्तीतूनही मोठा रोजगार उपलब्ध होतो.याशिवाय खैर, बांबू,साग,रबर लागवडीपासून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.यासाठी रिकाम्या जागा लागवडीखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे.या योजना राबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.
www.konkantoday.com