
कुवारबाव रेल्वे स्टेशनवर चोरट्यांची टोळी पकडली
कुवारबाव रेल्वेस्थानकांवर चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.या टोळी कडून ४५ हजाराचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रमेश लक्ष्मण पवार राहणार हिसरे करमाळा सोलापूर ,शंकर सुरेश पवार राहणार हिसरे करमाळा सोलापूर , अमोल बिभीषण पवार राहणार उस्मानाबाद या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले.यातील आरोपी हे कुवारबाव रेल्वेस्टेशन येथे संशयास्पद स्थितीत फिरत होते.पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून त्यांनी त्यांना हटकले त्यांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन मोबाइल,घड्याळ, सोन्याची चेन,पैंजण व रोख रक्कम मिळून ४५ हजार रुपयांचा ऐवज त्यांच्याकडे मिळाला.त्यांना पोलिसांनी अटक केली या चोरट्यांच्या टोळीने जिल्ह्यात अशा अनेक चोऱ्या केल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे.
www.konkantoday.com