मेहुणीच्या प्रियकराने मंगळसूत्र चोरल्याचा संशय

मुंबईतून गणपती सणानिमित्त गावाला आलेल्या मेहुणीच्या प्रियकराने ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरल्याची फिर्याद दाखल झाली आहे.मुंबई कल्याण येथील राहणारे फिर्यादी राजेश वसंत तांबे हे गणपती सणासाठी आपल्या कुटुंबासह कसबा येथे गावी आले होते. त्यावेळी त्यांची मेहुणी आरती व तिचा प्रियकर विकी हेही बरोबर होते यातील तांबे कुटुंब आपल्या मेहुणी व प्रियकरासह घरात झोपले होते. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने आपले ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र टीव्ही जवळच्या टेबलावर ठेवले होते.सकाळी उठल्यावर हे मंगळसूत्र आढळले नाही.हे मंगळसूत्र मेहुणीच्या प्रियकर विकी बाळकृष्ण जाधव याने चोरल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला.यामुळे विकीच्या विरोधात संशयित आरोपी म्हणून संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button