जिल्हा परिषदेच्या विविध८० पदासाठी मुलाखती सुरू ,विविध भागातून आले उमेदवार
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर्स,फार्मासिस्ट,अकाउंटन्ट, सोशल वर्कर आदि ८० पदे रिक्त आहेत.या पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे. या पदासाठी मुलाखती देण्यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागातून पात्र उमेदवार हजर आहेत.सकाळपासून आलेल्या उमेदवारांसाठी मात्र तेथे सुविधा नसल्याने जेथे जागा मिळते तिथे हे उमेदवार सामानासह बसले आहेत. त्यातच अनंत चतुर्दशी निमित्त शहरातील छोटी हॉटेल्स बंद असल्याने या उमेदवार व त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची जेवणाची व खाण्याची गैरसोय झाली.उशीरा मुलाखती घेण्याचे काम चालू होते.या ८० पदासाठी २७६ अर्ज आले होते. त्यापैकी मुलाखतीसाठी १८३ जणांची निवड करण्यात आली.सुटीच्या दिवशीही मुलाखतीचे काम सुरू होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अांचल गोयल ,जिल्हा आरोग्यधिकारी बबिता कमलापूरकर ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे हे उपस्थित होते.