गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील बसस्थानकात गर्दीचा फायदा उठवून महिलांच्या पर्समधील दागिने लांबविण्याचे प्रकार घडले असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा रेल्वेस्टेशनकडे वळविल्याचे दिसत आहे.रत्नागिरी रेल्वे स्थानकात रेल्वेत चढणार्या एका महिलेच्या पर्समधील पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरटय़ांनी लांबविले.
लाजुळ करबुडे येथे राहणाऱ्या साै.पल्लवी विजय आेर्पे या सध्या विरार येथे राहतात त्या गणपती सणासाठी गावाला आल्या होत्या विरार येथे जाण्यासाठी ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्या होत्या.मरूसागर एक्स्प्रेसमध्ये त्या आपल्या कुटुंबासह गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील पावणे दोन लाख रुपयांचे दागिने लांबविले.याबाबत त्यांनी रत्नागिरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here