माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा

0
275

माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा एकमेव पक्ष आहे.या विश्वासाने आपण आपमध्ये सामील झालो होतो. मात्र आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार हा विषय नाही असे जाहीर केले.याशिवाय आम आदमी पक्षात हुकुमशाही असल्यामुळे आपण आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. आज सर्वच राजकीय पक्षांचा भ्रष्टाचाराकडे कल आहे.आज भारतीय लोकशाहीत स्वच्छ चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान नेत्याची गरज आहे. म्हणून येत्या निवडणुकीत चरित्रवान उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले.आपण यापुढे कोणत्याही पक्षात जाणार नसून जे चारित्र्यवान उमेदवार असतील ते कुठलाही पक्षाचे असले तरी त्यांचा आपण प्रचार करणार आहोत असेही त्यानी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here