खेड स्थानकात मांडवी एक्स्प्रेस न थांबल्याने संतप्त प्रवाशानी घातला गोंधळ
कोकणातील गणपती उत्सव संपल्याने मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या चाकरमान्यानी खेड रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली आहे. मडगाव येथून मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड रेल्वे स्थानकात न थांबता पुढे गेल्याने प्रवासी संतप्त झाले. खेड येथून अनेकांनी परतीची बुकिंग केली होती परंतु मांडवी एक्स्प्रेस न थांबल्याने तिची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना गाडीत चढता आले नाही.संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरचा केबिनकडे धाव घेतली.संतप्त झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.दरम्यान रेल्वे पोलीस व खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाशांनी बुकिंग करून देखील मांडवी एक्सप्रेस न थांबल्याने मुंबईकडे जायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला. काही वेळाने हॉलिडे एक्स्प्रेस खेड स्थानकात दाखल होणार आहे. त्यातून प्रवाशांना पाठवण्यात येईल असे रेल्वे तर्फे जाहीर करण्यात येत आहे.मात्र ही हॉलिडे एक्स्प्रेस प्रवाशांनी खच्चून भरलेली असल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना त्यात जागा कशी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉलिडे एक्स्प्रेस गाडी खेड स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना जर जागा मिळाली नाही तर परत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com