बहिणीकडे राहण्यास आलेल्या तरुणीची पोलिस मुख्यालयाच्या वसाहतीत आत्महत्या
आपल्या बहिणीकडे राहावयास आलेल्या सांगली येथील तरुणीने रत्नागिरी शहरातील पोलीस मुख्यालयाच्या निवासी वसाहतीतील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आरती अंकुश चव्हाण (२१) राहणार सांगली असे आहे.मूळची सांगली येथील असलेली आरती या आपल्या पोलिस असलेल्या बहिणीकडे पोलीस मुख्यालयाच्या शेजारील वसाहतीत च्या खोलीत राहत होती. तिची पोलीस असलेली बहीण दुपारी ड्युटीवर गेल्यानंतर आरती घरात एकटी होती. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने घरातील वाशाला गळफास लावून आत्महत्या केली.संध्याकाळी तिची बहिण डय़ुटीवरून परत आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली.आरती हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
www.konkantoday.com