शेअर रिक्षांवर पोलिसांचे व परिवहन खात्याचे लक्ष
रत्नागिरी: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या आदेशाप्रमाणे रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते शहर या दरम्याने शेअर रिक्षाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या शेअर रिक्षा चालकांकडून ही वाहतूक नियमाप्रमाणे होत आहे की नाही यासाठी वाहतूक पोलिसांसह परिवहन खात्याने त्यावर लक्ष ठेवले आहे. शेअर रिक्षाचे दरही निश्चित करण्यात आले असून रिक्षाचे भाडे आकारताना ३३% अधिकच भाडे घेण्याचे निश्चित करण्यात आले असून रिक्षा आकारणीचा दर असणारे फलक लवकरच या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. याशिवाय कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून हातखंबा येथून येणार्या एस.टी. बसेस रेल्वे स्टेशनमार्गे वळविण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com