गणपती उत्सवात देखील रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमय राहिले
गेले काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य रस्त्यातील खड्ड्यांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी गणपतीपूर्वी शहरातील खड्डे पूर्णपणे भरले जातील व खड्डेरहित रस्ता नागरिकांना पाहायला मिळेल असे सांगितले होते.प्रत्यक्षात मात्र रत्नागिरीकरांना गणपती सणात देखील चाळण झालेल्या खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे.पावसामुळे खड्डे भरता येत नाहीत असे कारण सांगणाऱ्या नगरपरिषदेला मध्यंतरी पावसानेही विश्रांती देऊन काम करण्याची संधी दिली होती.अनेक ठिकाणी वाहतूक बंद करून नगर परिषदेने आपल्या पद्धतीने काम करून हे खड्डे भरले होते मात्र काही दिवसातच या खड्ड्यातील खडी बाहेर आली होती. सध्या चार दिवस पडणार्या पावसाने तर बुजवण्यात आलेले खड्डे पूर्णपणे उखडले गेले असून नागरिकांना व गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे